वैशाख पौर्णिमा: बुद्धांचा प्रकाशपर्व!

Rokhthok Maharashtra 19 0

आज वैशाख पौर्णिमा… मानवजातीसाठी ‘प्रकाशपर्व’!
याच दिवशी लुंबिनीमध्ये सिद्धार्थाचा जन्म झाला…
बोधगयेत ज्ञानप्राप्ती झाली… आणि कुशीनगरात महापरिनिर्वाण…
एकाच दिवशी जन्म, ज्ञान आणि निर्वाण — म्हणूनच हा दिवस खास!
गौतम बुद्धांनी समतेचा संदेश दिला…
जातीभेद, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला…
त्यांचा संघ सर्वांसाठी खुला होता — स्त्री-पुरुष, राजा-रंक सर्व समान!

त्यांचा संदेश स्पष्ट — “अत्त दीपो भव”
म्हणजेच स्वतःचा मार्ग स्वतःच शोधा…
अंधश्रद्धा नको, विवेक आणि अनुभवावर विश्वास ठेवा…
याच विचारातून विज्ञानवाद आणि मानवतेचा पाया रचला गेला…
बुद्धांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा —शांतता, समता आणि प्रज्ञेचा मार्ग!
बुद्धांनी देव नाकारला पण माणसातला माणूस जागवला. स्वर्गाचे आमिष नाही, नरकाची भीती नाही. फक्त एकच सांगितलं – इथेच, या जन्मात, चांगले वागून दुःखमुक्त होता येते.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.