हडपसरमध्ये जिममधील किरकोळ वादाचं हिंसाचारात रूपांतर! डंबेल, लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी तरुणावर जीवघेणा हल्ला.

Rokhthok Maharashtra 16 0

पुण्यातील हडपसरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिममध्ये सुरू असलेलं गाणं बदलल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
ही घटना सातववाडी येथील श्री फिटनेस जिममध्ये ६ जुलै रोजी घडली. फिर्यादी मुद्दसर रफिक सय्यद हे नेहमीप्रमाणे व्यायामासाठी आले असता त्यांनी जिममधील गाणं बदललं. याच कारणावरून आरोपी सूरज मुसळे, राज आणि त्यांच्या एका साथीदाराने त्यांच्याशी वाद घातला.
वाद इतका विकोपाला गेला की आरोपींनी मुद्दसर यांच्यावर डंबेल, लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
जखमी मुद्दसर यांच्यावर वैद्यवाडी येथील साई क्लिनिकमध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक राघवेंद्र सलगर पुढील तपास करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.