५ वर्षांच्या दिव्यांग मुलाची आई-वडिलांकडून हत्या; हातात होतं खाऊचं पाकीट

Rokhthok Maharashtra 12 0

छत्रपती संभाजीनगरमधून माणुसकीला हादरवून टाकणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे.
अवघ्या ५ वर्षांच्या दिव्यांग चिमुरड्याची त्याच्याच आई-वडिलांनी निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
हर्सूल-सावंगी बायपास परिसरातील शेतात या चिमुरड्याचा मृतदेह आढळून आला… आणि घटनास्थळी पाहिलेलं दृश्य पाहून गावकरीही हळहळले.
मृतदेह बाहेर काढताना त्या निष्पाप मुलाच्या हातात खाऊचं पाकीट घट्ट पकडलेलं होतं.
जीव घेण्यापूर्वी मुलाला शांत करण्यासाठी आई-वडिलांनी त्याच्या हातात खाऊ दिल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार, मुलाचं नाक आणि तोंड दाबून श्वास रोखण्यात आला. इतकंच नाही तर डोक्यावर आणि पोटावर बोथट वस्तूने मारहाण केल्याचंही स्पष्ट झालं आहे.
शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या मुलाचं ओझं वाटू लागल्यानेच हा क्रूर प्रकार केल्याचा आरोप आहे.
या घटनेमुळे संपूर्ण छत्रपती संभाजीनगर हादरलं असून… जन्मदात्या आई-वडिलांविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.