“भारतविरोधी विधाने करणाऱ्या महिलेविरोधात गंभीर गुन्हा; “शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांची तत्पर कारवाई!

Rokhthok Maharashtra 21 0

पुणे शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महंम्मदवाडी येथील मारगोसा हाइट्स सोसायटीमध्ये राहणाऱ्या फराह दिबा नामक महिलेने व्हॉट्सॲप ग्रुपवर भारतविरोधी आणि पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह व अपमानास्पद विधाने केल्याचा गंभीर आरोप तिच्यावर करण्यात आला आहे.

सदर महिला सोसायटीतील महिलांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सातत्याने देशविरोधी भावना भडकावणारे संदेश टाकत होती. तसेच, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अत्यंत अशोभनीय व अवमानकारक भाषा वापरत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. यामुळे संपूर्ण सोसायटीमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. हा प्रकार सामाजिक सलोख्यावर घातक ठरू शकतो, असं अनेक रहिवाशांचं मत आहे.

पोलिसी कारवाई…

या प्रकाराची गंभीर दखल घेत शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी थेट काळेपडळ पोलीस ठाण्यात लेखी निवेदन दिलं. यानंतर सोसायटीतील अनेक रहिवाशांनीही पोलिसांकडे स्वतंत्र लेखी तक्रारी दाखल केल्या.

या तक्रारींच्या आधारे भारतीय दंड संहितेच्या कलम 152, 196, 197, 352 आणि 353 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.“देशविरोधी विधाने करणाऱ्यांना एक क्षणही माफ करता येणार नाही. पंतप्रधानांविषयी अपमानकारक बोलणं म्हणजे संपूर्ण देशाचा अपमान आहे. शिवसेना याचा तीव्र निषेध करतो आणि कायद्याच्या माध्यमातून कठोर कारवाईची मागणी करतो.” 

प्रमोद नाना भानगिरे – शहरप्रमुख शिवसेना 

🔎 (चौकशी सुरू):

सध्या काळेपडळ पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी सुरू केली आहे. फराह दिबा हिच्या विरुद्ध आवश्यक पुरावे गोळा केले जात असून, लवकरच पुढील कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.

भारतविरोधी वक्तव्यं आणि राष्ट्रविरोधी मानसिकता कुठल्याही सुजाण नागरिकाला सहन होणार नाही. समाजात अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी कायद्याचा कठोर अंमल आवश्यक आहे, हे या घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.