14 लाख महिलांचा लाभ बंद? लाडकी बहीण योजनेत मोठा धक्का

Rokhthok Maharashtra 2 0

“मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राज्यातील तब्बल १४ लाख महिलांचा लाभ बंद होण्याच्या मार्गावर आहे.
कारण काय? तर या लाभार्थींनी सरकारने दिलेल्या मुदतीत ‘ई-केवायसी’ प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र तरीही अनेकांनी टाळाटाळ केली.
या योजनेत पात्र ठरण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ‘ई-केवायसी’मुळेच ही पडताळणी शक्य होते.
दरम्यान, पडताळणीत आधीच ७१ लाख लाभार्थी अपात्र ठरले आहेत. काहींनी नियम मोडत एका कुटुंबातून अनेक महिलांनी लाभ घेतल्याचेही समोर आले आहे.

तसेच, चारचाकी वाहन, सरकारी नोकरी किंवा वयोमर्यादेबाहेर असणाऱ्यांचाही लाभ बंद करण्यात आला आहे.
आता ज्या महिलांची ‘ई-केवायसी’ बाकी आहे, त्यांना ३० एप्रिलपर्यंत शेवटची संधी देण्यात आली आहे.
वेळेत प्रक्रिया पूर्ण न केल्यास, या १४ लाख महिलांचा लाभ आपोआप बंद होणार आहे.
म्हणूनच, पात्र लाभार्थींनी तातडीने ‘ई-केवायसी’ पूर्ण करणे आवश्यक आहे.”

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.