पुणे

मैत्रीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार : दोन वर्षांपूर्वी घडलेली घटना उघड – हडपसर मध्ये गुन्हा दाखल

पुणे : – (Rokhthok Maharashtra Online )

अल्पवयीन मुलीबरोबर मैत्री करुन एका तरुणाने तिच्याबरोबरच्या मैत्रीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार  केला. त्यानंतर ही 9 वर्षाची मुलगी आईसमवेत गोव्याला गेली. आता दोन वर्षानंतर या मुलीने आपल्यावर न कळत्या वयात घडलेल्या प्रसंगाची माहिती आईला दिली. त्यानंतर त्यांनी आता फिर्याद दिली आहे.

हडपसर पोलिसांनी  कुणाल पटेल  (वय २०, रा. फातिमानगर) याच्याविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्याखाली  गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १ ते २८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान घडला होता. फिर्यादी यांच्या ९ वर्षाच्या मुलीशी कुणाल पटेल याने मैत्री केली. त्यातून तिच्याशी जवळीक साधून तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध  ठेवले. त्यानंतर हे कुटुंब गोव्याला गेले. या मुलीने हा प्रकार आता आपल्या आईला सांगितला. त्यानंतर तिच्या आईने गोव्यातील मापसा पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली. तेथून ही फिर्याद हडपसर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे.