पुणे

लोणी काळभोर मध्ये मुलींना २०० सायकलींचे वाटप – विद्यार्थिनींमध्ये उत्साह

प्रतिनिधी : स्वप्नील कदम

घर आणि शाळेतील अंतर हे मुलींच्या शिक्षणावर विपरीत परिणाम करणारे ठरू नये. या उद्देशाने आगामी काळात आणखी ५०० सायकलींचे विद्यार्थींनीना वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती  हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती युगंधर काळभोर यांनी दिली. 

                                 पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लोणी काळभोर (ता. हवेली ) श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कन्या प्रशालेतील इयत्ता पाचवी ते सातवीच्या वर्गात शिकत असलेल्या २०० मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी युगंधर काळभोर बोलत होते. 

                        यावेळी जेष्ठ नेते माधव काळभोर, प्रताप गायकवाड, साधना बॅन्केचे संचालक सुभाष काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर, सूर्यकांत काळभोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आप्पासाहेब काळभोर, हवेली पंचायत समितीचे उपसभापती अनिल टिळेकर, जिल्हा परिषद सदस्या सुनंदा शेलार, सरपंच राजाराम काळभोर, उपसरपंच संगीता काळभोर, माजी सरपंच भोलेनाथ शेलार, माजी उपसरपंच आण्णासाहेब काळभोर, राजेंद्र काळभोर, ज्योती काळभोर, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, भरत काळभोर, माधुरी काळभोर, ललिता काळभोर, सविता लांडगे, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज काळभोर, ग्राहक संरक्षण समितीचे सूर्यकांत गवळी, अमित काळभोर, सागर काळभोर, पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलचे प्राचार्य सीताराम गवळी, केंद्रप्रमुख भरत इंदलकर, कल्पना बोरकर आदी उपस्थित होते. 

                         यावेळी बोलताना युगंधर काळभोर म्हणाले प्रत्येक गरजू विद्यार्थीनी पर्यंत सायकल पोहोचली पाहिजे. तसेच ग्रामीण भागातील मुलींना शाळेत चालत जावे लागते. यात त्यांचा वेळ वाया जातो.  अनेकदा त्यामुळे त्यांची शाळेतून गळती होते. यामुळे त्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होतो. केवळ घरापासून शाळेचे अंतर अधिक म्हणून मुलींचे शिक्षण बंद होऊ नये म्हणून मुलींना सायकल वाटप करण्यात येत आहे. आगामी काळात आणखी ५०० सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे.

                                सायकल मिळालेल्या मुली यावेळी आनंदी दिसत होत्या. ” चालत शाळेत जाण्यापेक्षा सायकलवरुन शाळेत गेल्यास आम्ही लवकर शाळेत पोहचू. त्यामुळे वाचलेल्या वेळात अभ्यास करता येईल ” अशी बोलकी प्रतिक्रीया विद्यार्थीनींनी यावेळी दिल्या.