पुणे

विकासकामांमुळे प्रभाग 44 व प्रभाग 46 मध्ये नाना भानगिरे यांचे वर्चस्व प्रभाग 44 मधून नितीन गावडे व अभिमन्यू भानगिरे दावेदार शिवसेनेला पूरक प्रभाग, आघाडी होणार की बिघाडी

 

पुणे / हडपसर (विशेष प्रतिनिधी – रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
पुणे महापालिकेचे महिला व अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण जाहीर झाल्याने प्रभागात उमेदवारीचे आराखडे बांधले जात आहेत, प्रभाग 44 व प्रभाग 46 मध्ये शिवसेनेचे वर्चस्व असल्याने येथून माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांना विश्वासात घेतल्याशिवाय उमेदवारी फायनल होणार नाही असे चित्र आहे, त्यातच महाविकासाघाडी होणार की बिघाडी याचा निर्णय अद्याप झाला नसला तरी गुडघ्याला बाशिंग बांधून उमेदवाऱ्या जाहीर करणाऱ्या उत्साही नेत्यांना वेट अँड वॉच भूमिकेत रहावे लागणार आहे.
पुणे महापालिकेचे निवडणूक रणशिंग फुकल्यात जमा आहे, आज जाहीर झालेल्या सोडत मध्ये प्रभाग 44 च्या अ मध्ये सर्वसाधारण महिला, ब मध्ये सर्वसाधारण व क मध्ये सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे, प्रभाग 46 च्या अ मध्ये अनुसुचित जाती महिला, सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे येथे शिवसेनेचे दोन नगरसेवक होते, दोन्ही प्रभागात शिवसेनेचे चांगले वर्चस्व आहे, तीन वेळा नगरसेवकपद भूषविलेले प्रमोद नाना भानगिरे यांचे काम या भागात चांगले आहे, त्यातच अनेक वर्षाचा रखडलेला पाणी पुरावठा प्रकल्प महापालिकेच्या 24×7 या योजनेतून मार्गी लागले, याचे श्रेय भानगिरे यांना जाते कारण त्यांनी पाठपुरावा करून वेळप्रसंगी राज्याचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पालिका आयुक्तांना संपर्क करून काम लवकर पूर्ण करण्यासाठी आदेश दिले होते. त्यामुळे येथील पाणीपुरवठा सुरू करण्यात त्यांची भूमिका मोलाची राहिली आहे, या प्रभागात पाणी हा कळीचा मुद्दा बनला होता, हा प्रश्न सुटल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, प्रभाग 46 शिवसेनेने नाना भानगिरे यांना दत्तक दिल्याने नव्याने समाविष्ट गावांमध्ये भरगोस निधी टाकून येथील अनेक मूलभूत प्रश्न सोडविण्यात पुढाकार घेतला होता, तसेच प्रभागातील प्रलंबित विकासकामांसाठी राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 16 कोटी 50 लाख रुपये निधीची मागणी केली होती.
येथील प्रश्न सोडविण्यात व दांडगा जनसंपर्क आणि कार्यालयातून नागरिकांची होणारी कामे आणि स्वखर्चातून शेकडो लोकांना मदत यामुळे माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांना लोकनेता म्हणून ओळखले जाते, सर्व पक्षीय नेत्यांबरोबर असलेले संबंध आणि प्रभागात केलेली विकासकामे लक्षात घेता शिवसेना नेतृत्व भानगिरे यांना विश्वासात घेतल्याशिवाय उमेदवारी वाटप करणार नाहीत पाच वर्षे लोकोपयोगी काहीच काम न करणारे अतिउत्साही आता उमेदवारी फायनल झाल्याचे सांगून संभ्रम निर्माण करत आहेत.
एकंदरीत युवकांचा संच व कामाचा आवाका पाहून या दोन प्रभागात आघाडी झाली तरी व स्वतंत्र लढविण्याची वेळ आली तरी नाना भानगिरे यांना विश्वासात घेतल्याशिवाय सक्षम पॅनल होणार नसल्याची चर्चा प्रभागात आहे.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी हडपसर मध्ये लक्ष केंद्रित केले आहे, नाना भानगिरे यांच्या प्रभागात कार्यक्रमांना भेटी देत शिवसैनिकांचे मनोबल वाढविण्याचे काम केले आहे, राज्य शासनाकडून निधी मिळावा म्हणून या दोन नेत्यांनी पाठपुरावा केला आहे, त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारांना फायदा होणार आहे, नाना भानगिरे यांना राजकीय ताकद देण्यास सचिन अहिर व आढळराव पाटील अग्रभागी असतात.
अजून आघाडी, जागा वाटप, यावर अनेक गोष्टी अवलंबून असून अतिमहत्वकांशी लोकांनी मात्र गुडघ्याला बाशिंग बांधले आहे, आणि आपल्या उमेदवाऱ्या जाहीर करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून प्रभाग 44 मध्ये नितीन गावडे आणि नाना भानगिरे यांचे बंधू अभिमन्यूभानगिरे यांनी काम सुरू केल्याने ते शिवसेनेतून प्रबळ दावेदार आहेत तर तीन वेळा नगरसेवक पद भूषविणारे प्रमोद नाना भानगिरे प्रभाग 46 मधून शिवसेनेचे उमेदवार असतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

प्रभाग 42, 44 व 46 मध्ये शिवसेनेच्या इच्छूकांना संधी
माझ्या जुन्या प्रभागाचे तीन प्रभाग झाले आहेत, तीन वेळा नगरसेवक पद भुषविताना अनेक प्रकल्प साकारले कोट्यवधी रुपयांचा निधी आणला, कोण काम करते नको फक्त फ्लेक्स लावून चमकोगिरी करते हे जनतेला माहीत आहे, उमेदवारी बाबत पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांना अहवाल दिला जाईल मग उमेदवार फायनल होतील, कोणीही हुरळून जाऊ नये अजून मोठा प्रवास बाकी आहे, शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
प्रमोद नाना भानगिरे
मा.नगरसेवक पुणे मनपा