पुणे

वाहन आणि फ्लिपकार्ड चोरीतील आरोपी जेरबंद हडपसर पोलिसांची कामगिरी ः पाच लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे  ः वाहनचोरीचे १० गुन्हे आणि फ्लिपकार्ट बॅग चोरी करणाऱ्याला हडपसर पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून ११ गुन्ह्यातील पाच लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हडपसर पोलिसांनी जप्त केला.
आकाश मनोहर गायकवाड (वय २६, रा. नेहरू पार्क, गणपती मंदिराशेजारी, काळेपडळ, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
हडपसर पोलीस पेट्रोलिंग करीत असताना संशयावरून आरोपीला ताब्यात घेऊन तपास केला असता फ्लिपकार्ट बॅग आणि १० वाहनचोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने हडपसर, कोंढवा, भारती विद्यापीठ, सासवड परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक विश्वास डगळे (गुन्हे) यांच्या सूचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, अंकुश बनसुडे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, सूरज कुंभार, भगवान हंबर्डे यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.