पुणेमहाराष्ट्रहडपसर

मैत्रिणींना फिरायला नेण्याच्या बहाण्याने बलात्कार करणारे जेरबंद

हडपसर पोलिसांची कारवाई ः

पुणे, दि. ३१ ः मैत्रिणींना फिरायला नेण्याच्या बहाण्याने नदीपात्रात नेऊन बलात्कार करणाऱ्यांना अटक केली. अनुराग साळवे (वय २१), गणेश अनिल म्हेत्रे (वय २३, दोघे रा. आनंदनगर, केशवनगर, मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना मुळा-मुठा नदीपात्रात मांजरी बु।। येथे घडली. या प्रकरणी १५ वर्षीय मुलीने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीच्या दोन मैत्रिणींना अनुराग आणि गणेश यांनी फिरायला नेतो असे सांगून गाडीवर बसवून मांजरी नदीपात्राच्या झाडीत नेले. तेथे त्या दोघांनी एकांताचा फायदा घेऊन जबरदस्तीने शरीर संबंध करून पळून गेले. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलस निरीक्षक दाभाडे करीत आहेत.