Uncategorizedपुणे

पुण्यात मूकबधिर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, निष्क्रिय समाजकल्याण मंत्री दिलिप कांबळे यांनी राजीनामा द्यावा… – संतोष शिंदे

शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात महाराष्ट्रातील आंदोलक मुकबधीर कर्णबधीर विद्यार्थी व विद्यार्थीनींचा वेगवेगळ्या मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने मोर्चा समाजकल्याण आयुक्त कार्यालयावर होता. परंतु या कर्णबधिर मूकबधिर विद्यार्थ्यांवर, महिलांवर, मुलींवर लाठीचार्ज करुन अमानुष मारहाण करण्यात आली. हे पुण्यासह महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे. या घटनेचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने सर्वप्रथम निषेध करीत समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी राजीनामा दयावा अशी मागणी संतोष शिंदे यांनी दिला आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे, की महाराष्ट्रातील लोकशाही संपली की काय…? लोकशाही जिंदाबाद म्हणायची का…? असा प्रश्न महाराष्ट्रात आज अमानुष लाठीचार्ज आंदोलन पाहिल्यानंतर प्रत्यक्षदर्शी पाहण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस, समाज कल्याण मंत्री दिलिप कांबळे यांच्या गलथान कारभाराचा आज महाराष्ट्रासमोर काळा चेहरा समोर आलेला आहे. मुकबधीर कर्णबधीर विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी राज्याच्या समाजकल्याण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत आणि गृहमंत्री आज सपशेल अपयशी ठरलेले आहेत. निष्क्रिय ठरलेले आहेत राजीनामा देणे सरकारची त्यांची नैतिक जबाबदारी आहे. त्यांचा आवाज दाबला, त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं… अशा विद्यार्थ्यांवर पोलिस प्रशासनाचे लक्ष समाज कल्याण विभाग आणि राज्य सरकारच्या महाराष्ट्रातील प्रत्येक आंदोलन सरकारने चिरडण्याचा दाबण्याचा किंवा संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचे उत्तम उदाहरण आज मुक्या आणि बहिर्‍या विद्यार्थ्यांचं आंदोलन वर झालेला आहे. हे सरकार इतकं निर्दयी आहे की, लोकशाहीला काळीमा फासणारी घटना आज महाराष्ट्रात घडलेली आहे.

कर्णबधिर व मूकबधिर विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचे आदेश राज्याच्या समाजकल्याण मंत्री मा. दिलीप कांबळे यांनी दिलेले आहेत. मारहाणीचे पाप हे दिलीप कांबळे यांचं असून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.

महाराष्ट्रात कोणीही सुरक्षित नाही, सामान्य नागरिक महिला मुकबधीर, कर्णबधीर, अंध-अपंग यांच्यावर देशोधडीला लावण्याचे निर्णय किंवा संपवण्याचे निर्णय सरकारने आजपर्यंत घेतलेले आहेत. म्हणून मूकबधिर विद्यार्थी महिला यांच्यावर लाठी चार्ज करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन झालं पाहिजे. या सर्व लाठीचार्ज घटनेची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी चौकशी झाली पाहिजे. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांची भेट घेतली व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पहा व्हिडीओ

https://www.facebook.com/270875513728685/posts/381139282702307/

 

0 0 votes
Article Rating
62 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments