पुणे

“चहा पिताय? सावधान!…. कडक चहाचा कडू परिणाम!”

“चहा पिताय? सावधान! ज्या चहावर आपण दिवसाची सुरुवात करतो… तोच चहा आता ‘जबरदस्त सवय’ बनत चाललाय!”

“सध्या बाजारात चहाचे नवनवे ब्रँड्स येत आहेत… मसाला चहा, तंदूरी चहा, कडक कटिंग… आणि लोक अक्षरशः चहाला इतके सरावले गेले आहेत की दिवसात अनेकदा तो घेतलेला दिसतो. पण त्याचे शरीरावर नेमके काय परिणाम होतात?

 

जास्त चहा म्हणजे शरीरात अॅसिडिटी वाढते.
कॅफिन जास्त घेतलं तर डोकेदुखी, चिडचिड, झोप कमी होणे—असं होतं.
दिवसभरात अनेकदा चहा घेतल्याने डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील पाणी कमी होऊ शकतं.
काही वेळा लोहतत्त्व कमी होऊन हिमोग्लोबिनवर परिणाम होतो.
साखर जास्त असल्यास वजन वाढणं आणि ब्लड शुगरवर परिणाम होणं शक्य.दुकानांवर मिळणाऱ्या ‘कडक चहा’मध्ये कधी जास्त कॅफिन, कधी जास्त मसाले किंवा दर्जाहीन दूध वापरलं जातं.
हे सगळं मिळून शरीराला हळूच नुकसान करतं… आणि आपल्याला कळतही नाही.”

“चहा प्यायचा… पण संयमाने.
नाहीतर हा छोटासा कप… मोठं नुकसान करू शकतो!”