पुणे

पीडित महिलेची तीन लाखांची फसवणूक, चतुर्श्रुंगी पोलिसांत तक्रार! कारवाईत अन्यायच….!

जमीन देतो असे सांगून ऑनलाईन तीन लाख रुपये घेतल्याचा आणि नंतर जमीन न देता फसवणूक केल्याचा गंभीर आरोप चतुर्श्रुंगी परिसरात समोर आला आहे. पीडित महिला रूपाली किरण शिंदे यांनी चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून पोलिसांनी आपल्या सोयीने अदखलपात्र गुन्हा दाखल केला. महिला पोलीस अधिकाऱ्याने मीडियाकडे जाऊ नका कंपनी तुमचे पैसे देईल आता पोलीस स्टेशनला यायची गरज नाही आता आम्ही बघू असा सल्ला देऊन पीडित महिलेवरच दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या हवालदाराने वसुलीसाठी 20 हजार मागितल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.तक्रारीनुसार, चतुर्श्रुंगी येथील विजय सेल्स इमारतीमध्ये सुप्रीम इंडस्ट्री या नावाने व्यवसाय करणारे विजय सरोदे, दिपाली देशमुख आणि प्रदीप सूर्यवंशी यांनी तीन गुंठे जमीन देण्याचे आश्वासन देत तीन लाख रुपये ऑनलाईन घेतले. आणि फसवणूक केली.

 

पीडित महिलेच्या पतीची शस्त्रक्रिया झाल्याने तातडीने पैशांची गरज होती. पैसे परत मागितल्यावर शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी तसेच बाउन्सरमार्फत हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिलेला चेक बाउन्स झाल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे. पीडित महिला गरीब असून वारंवार पोलीस स्टेशनच्या चकरा मारूनही योग्य कारवाई होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तुमचे पैसे काढायचे असतील तर मला वीस हजार द्यावे लागतील असे एका हवालदाराने बोलल्याचे पीडित महिलेने सांगितले. याबाबत रोखठोक महाराष्ट्र न्यूजने आवाज उठवला आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त कार्यालयातही ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे राज्य समन्वयक अनिल मोरे यांनी सांगितले की, न्याय मिळाला नाही तर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे दाद मागण्यात येईल. सध्या या प्रकरणात सखोल तपास होऊन पीडित महिलेला न्याय मिळणार का, आणि आरोपींवर कडक कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलीस पीडीतेच्या न्याय देतात? की फ्रॉड करणाऱ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनास पाठीशी घालतात यावर पीडित महिलेचा न्याय अवलंबून आहे.
या कंपनीकडून कोणाची फसवणूक झाली असल्यास तातडीने आमच्याशी संपर्क साधा आम्ही याप्रकरणी चॅनलच्या माध्यमातून आवाज उठवू.