अशोक खरात अटकेत! 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले | बड्या नेत्यांचा ‘ज्योतिषी’ वादात

Rokhthok Maharashtra 17 0

आजच्या धक्कादायक बातमीमध्ये मोठा खुलासा समोर आलाय!
स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवणारा आणि बड्या नेत्यांचं भविष्य सांगणारा अशोक खरात आता अडचणीत सापडलाय. नाशिक पोलिसांनी त्याला ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पहाटे ३ वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे
खरातच्या पेन ड्राइव्हमधून तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. सध्या या व्हिडिओंची सत्यता तपासली जात आहे.
अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जात होते. त्यामुळे या घटनेने हायप्रोफाइल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मर्चंट नेव्हीमध्ये काम केलेला आणि स्वतःला अंकशास्त्रज्ञ सांगणारा खरात आता गंभीर आरोपांमुळे चर्चेत आला आहे.
या प्रकरणात अजून कोणकोणती नावे समोर येणार?
हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.