पुण्यात 3 पोलिस निलंबित! मध्यरात्रीचा धक्कादायक प्रकार

Rokhthok Maharashtra 19 0

पुण्यातील वाघोली पोलीस ठाण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
तीन पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं असून पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
निलंबित पोलिसांमध्ये हवालदार किरण अब्दागिरे आणि शिपाई गणेश खाडे व किरण कांबळे यांचा समावेश आहे.
परिमंडळ सातचे उपायुक्त सोमय मुंडे यांनी ही कारवाई केली आहे.

माहितीनुसार, २ एप्रिलच्या रात्री डायल 112 वरून कॉल आल्यानंतर
खाडे आणि कांबळे हे एका सोसायटीत गेले आणि 24 वर्षीय तरुणाला पोलीस ठाण्यात आणलं.
तिथे ठाणे अंमलदार असलेल्या अब्दागिरे यांनी
तरुण-तरुणीला “सेक्स रॅकेटमध्ये अडकवतो, नोकरी घालवतो” अशा धमक्या दिल्या
आणि त्यांच्याकडून 10 हजार रुपये PhonePe वर उकळल्याचा आरोप आहे.
यावेळी एका पोलिसाने तरुणाला मारहाण केल्याचंही समोर आलं आहे.
तक्रार वरिष्ठांकडे पोहोचताच चौकशी झाली
आणि तिन्ही पोलिसांना तात्काळ निलंबित करण्यात आलं.
आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे..

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.