पुणे

चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केशवनगरमध्ये मोफत वृक्ष वाटप | नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुण्यातील केशवनगर परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा एक प्रेरणादायी उपक्रम पार पडला. नगरसेविका नंदाताई अनिल आबनावे आणि अनिल जगन्नाथ आबनावे यांच्या वतीने भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक १५ मध्ये मोफत वृक्ष वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
केशवनगर येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक तसेच युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वृक्षांचे वितरण स्वीकारले.
यावेळी उपस्थित महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, पर्यावरण संवर्धन ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. वाढदिवस साजरा करण्याचा हा समाजोपयोगी आणि आदर्श उपक्रम असून प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे.
स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की, अशा वृक्ष वाटप मोहिमेमुळे पर्यावरणाबाबत जनजागृती होत असून परिसर अधिक हिरवागार होण्यास मदत होणार आहे. तसेच पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि निरोगी वातावरण निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
नगरसेविका नंदाताई अनिल आबनावे आणि अनिल जगन्नाथ आबनावे यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प केला.
“झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश देत चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा वृक्ष वाटप समारंभ उत्साहात आणि नागरिकांच्या भरघोस प्रतिसादात संपन्न झाला.