दिल्लीमधून एक भावूक करणारी घटना समोर आली आहे.
घटस्फोटासाठी कोर्टात जाण्याच्या तयारीत असलेल्या पती-पत्नीच्या आयुष्यात अचानक मोठा बदल घडला.
माहितीनुसार, कोर्टात जाण्याच्या आधी पत्नीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर पत्नी त्यांना तातडीने रुग्णालयात घेऊन गेली.
ही माहिती मिळताच पतीने कोर्टात जाण्याऐवजी थेट हॉस्पिटल गाठलं आणि सासऱ्यांच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी स्वतः घेतली.
पतीचा हा आधार आणि संवेदनशीलता पाहून पत्नी भावूक झाली. तिने घटस्फोटाचे कागद फाडून टाकले आणि पतीला मिठी मारत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 2020 मध्ये लग्न झालेल्या या जोडप्यामध्ये सतत वाद होत होते. पण या प्रसंगानंतर दोघांनी सर्व मतभेद विसरून पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.
ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते — संकटात जो साथ देतो, तोच खरा आपला असतो.
घटस्फोटाच्या वाटेवरून पुन्हा एकत्र आले दाम्पत्य
