पुणे

प्रणित मोरेवर पहिली मोठी कारवाई 🚨 सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सायबर पोलिसांनी प्रणित मोरे आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्यांच्या शोमधील काही व्हिडिओंवरून ही कारवाई करण्यात आली.
या व्हिडिओंमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह आणि अवमानकारक वक्तव्य झाल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी BNS आणि IT अॅक्टच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रणित मोरे, हिमांशू जांगरा आणि डॉ. सेजल पवार यांना चौकशीसाठी समन्सही बजावण्यात आले आहेत.

सोशल मीडियावर या व्हिडिओंवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.
सध्या महाराष्ट्र सायबर पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.