19 वर्षीय तरुणीचा धक्कादायक निर्णय! 55 वर्षीय शिक्षकासोबतच जाणार म्हणाली

Rokhthok Maharashtra 19 0

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 19 वर्षीय तरुणीला पळवून नेल्याच्या संशयावरून संतप्त ग्रामस्थांनी थेट शाळेत घुसून 55 वर्षीय शिक्षकाला बेदम मारहाण केली.
काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणीला संबंधित शिक्षकाने पळवून नेल्याचा आरोप करत ग्रामस्थ आक्रमक झाले होते. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून शिक्षकाची सुटका केली आणि दोघांनाही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले.
मात्र चौकशीदरम्यान मोठा ट्विस्ट समोर आला. संबंधित तरुणीने पोलिसांसमोर स्पष्ट सांगितले की, “मी आई-वडिलांकडे जाणार नाही, मी शिक्षकांसोबतच जाणार आहे.” तिने याबाबत लेखी जबाबही दिला आहे.
तरुणी सज्ञान असल्याने कायद्यानुसार तिला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच शिक्षकावर पुन्हा हल्ला केल्यास कठोर कारवाईचा इशाराही ग्रामस्थांना देण्यात आला आहे.
या प्रकरणाची सध्या संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.