हांडेवाडीत दारूच्या पार्टीतून थेट खून!

Rokhthok Maharashtra 25 0

पुण्यातील हांडेवाडी परिसरात दारू पिताना झालेल्या किरकोळ वादाचे रूप थेट खुनात बदलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
रागाच्या भरात एका तरुणाने आपल्या मित्राची सिमेंट ब्लॉकने ठेचून हत्या केली.
मृत तरुणाची ओळख आकाश मारुती झांबरे, वय ३१ अशी झाली आहे. तर आरोपी आकाश अशोक भरेकर, वय ३१ याला काळेपडळ पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, तिघे मित्र रात्री एकत्र बसून दारू पित होते. त्यावेळी किरकोळ वाद झाला आणि हा वाद इतका वाढला की आरोपीने सिमेंट ब्लॉकने डोक्यावर आणि तोंडावर वार करत मित्राची निर्घृण हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास काळेपडळ पोलीस करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.