लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक! सायबर टोळी सक्रिय

Rokhthok Maharashtra 33 0

लग्नासाठी मॅट्रिमोनी साइट्सवर जोडीदार शोधत असाल, तर ही बातमी नक्की पाहा!
कारण सायबर चोरट्यांनी आता विवाह संकेतस्थळांवरही जाळं पसरवलं आहे.
सुशिक्षित तरुण-तरुणींना लक्ष्य करून आकर्षक आणि बनावट प्रोफाइल तयार केली जात आहेत. आधी गोड बोलून विश्वास जिंकायचा, भावनिक नातं निर्माण करायचं आणि नंतर विविध बहाण्यांनी पैसे उकळायचे — असा या टोळीचा डाव आहे.
सायबर गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, गेल्या दीड वर्षांत 350 हून अधिक नागरिकांची फसवणूक झाली आहे.
बाणेरमधील एका महिला अभियंत्याला तब्बल 18 लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. UK मधील डॉक्टर असल्याचं सांगून लग्नाचं आमिष दाखवत महागड्या गिफ्ट्स आणि कस्टम शुल्काच्या नावाखाली पैसे उकळण्यात आले.
पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
अनओळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका, प्रत्यक्ष भेटल्याशिवाय निर्णय घेऊ नका आणि कोणालाही पैसे पाठवू नका.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.