चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोंडपिपरी तालुका भाजपचे महामंत्री भानेश येग्गेवार यांच्याविरुद्ध १९ वर्षीय विवाहितेचा विनयभंग करून जबरदस्तीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी सध्या फरार आहे.
व्हॉईस ओव्हर :
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, २१ जून रोजी गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे कापूस पेरणीदरम्यान बियाणे आणण्यासाठी तक्रारदार महिला आणि भानेश येग्गेवार गावातील घरी गेले होते.
यावेळी घरात कोणी नसल्याची संधी साधून, “लग्नाला वर्ष झाले तरी तुला मूलबाळ नाही, मी मदत करतो,” असे म्हणत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
महिलेने आरडाओरड केल्यानंतर आरोपीने बदनामीची धमकी दिल्याचाही आरोप आहे. पीडितेला स्थानिक मराठी भाषा अवगत नसल्याने तक्रार दाखल करण्यास विलंब झाला. अखेर २७ जून रोजी तिने गोंडपिपरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पोलिसांनी भानेश येग्गेवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, आरोपी फरार आहे. त्याचा शोध सुरू असून प्रकरणाचा पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करत आहेत.
‘तुला मूलबाळ करून देतो’ म्हणत विवाहितेवर जबरदस्तीचा प्रयत्न? भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा
