पुण्यात हृदयद्रावक घटना; आईच्या निधनानंतर काही तासांतच लेकाचाही दुर्दैवी अंत

Rokhthok Maharashtra 21 0

पुण्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
आईच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने २५ वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
पर्वती दर्शन परिसरात राहणाऱ्या मंदा दोडके यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शनिवारी त्यांचे निधन झाले.
आईच्या जाण्याची बातमी मिळताच त्यांचा मुलगा साहिल दोडके हा मानसिक धक्क्यात गेला.
या घटनेनंतर काही वेळातच साहिलनेही स्वतःचे जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे.
नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत माय-लेकांवर एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हे दृश्य पाहून उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले.
या घटनेमुळे पर्वती दर्शन परिसरासह संपूर्ण पुण्यात शोककळा पसरली आहे.
मंदा दोडके आणि साहिल दोडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
कठीण प्रसंगात मानसिक आधार आणि संवाद किती महत्त्वाचा असतो, हे पुन्हा एकदा या घटनेतून समोर आलं आहे.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.