लग्न नव्हे, 1 कोटींचा डाव? सिया-चेतनचा प्लॅन उघड!

Rokhthok Maharashtra 23 0

पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याकांडात आता एक धक्कादायक आर्थिक अँगल समोर आला आहे. केवळ लग्न टाळण्यासाठीच नव्हे, तर कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारासाठी हा कट रचल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणात सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी पोलीस कोठडीत असून, तपासात नवनवीन खुलासे होत आहेत.
व्हॉईस ओव्हर :
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सियाला केतनसोबत लग्न करायचंच नव्हतं. केतनचा मृत्यू झाला तर लग्नाचा विषय किमान तीन वर्षांसाठी टळेल, असा तिचा समज होता. त्याच काळात चेतन स्वतःचा व्यवसाय उभा करेल आणि नंतर दोघे लग्न करतील, असा कथित प्लॅन आखण्यात आला होता.
याहूनही धक्कादायक म्हणजे, खरेदीच्या बहाण्याने सियाने केतनकडून तब्बल एक कोटी रुपये घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हे पैसे चेतनकडे वळवण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या आर्थिक व्यवहारांचा आता पोलीस कसून तपास करत आहेत.
मात्र, एक कोटी रुपयांचा व्यवहार झाला होता का, पैसे नेमके कुठे गेले आणि त्याचा हत्येशी संबंध काय, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. पोलीस बँक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि आर्थिक कागदपत्रांची तपासणी करत आहेत.
केतन अग्रवाल हत्या प्रकरण आता केवळ प्रेमसंबंध किंवा लग्नापुरतं मर्यादित राहिलेलं नसून, आर्थिक व्यवहारांचं मोठं रहस्यही उलगडण्याच्या दिशेने तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.