पुण्यातील सहकारनगर येथील सौ. सुशीला रमेश शिंदे यांच्या मृत्यूप्रकरणी सूर्या हॉस्पिटलसमोर आज तीव्र आंदोलन करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी त्यानंतर कसबापेठ पोलीस चौकीत जाऊन संबंधित डॉक्टर, कर्मचारी आणि जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत तक्रार सादर केली.
आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, उपचार सुरू करण्यापूर्वी आर्थिक अटींमुळे विलंब झाला. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही आणि संबंधित प्रकरणाची चौकशी होणे बाकी आहे.
या आंदोलनात युवा मित्र अनिरुद्ध उर्फ बापूशेठ भोसले, गणेशभाऊ घोष, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, या प्रकरणात संबंधित सर्व पक्षांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार असून, चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
