10 वर्षीय चिमुकलीवर सावत्र वडिलांचा अत्याचार; आईच्या तक्रारीनंतर आरोपी अटकेत

Rokhthok Maharashtra 10 0

पुणे जिल्ह्यातून मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १० वर्षांच्या चिमुकलीवर तिच्याच सावत्र वडिलांनी अत्याचार केल्याचा आरोप असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

भोर तालुक्यातील एका गावात रोजगारासाठी राहणाऱ्या कुटुंबात हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. घरात कोणी नसल्याची संधी साधून सावत्र वडिलांनी १८ आणि १९ जुलै रोजी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल झाली आहे. त्रास असह्य झाल्यानंतर चिमुकलीने आईला घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकताच आईने कोणताही विलंब न करता थेट राजगड पोलीस ठाणे गाठून पतीविरुद्ध तक्रार दिली.

राजगड पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, पीडितेला आवश्यक वैद्यकीय आणि कायदेशीर मदत दिली जात आहे. अशा गंभीर घटनांमध्ये पीडितेची ओळख गोपनीय ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.