Cyber Fraud Alert | पुण्यात ५ मोठे सायबर गुन्हे उघड!
पुण्यात सायबर फसवणुकीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. मनी ट्रेल विश्लेषणातून तब्बल पाच गुन्हे उघडकीस आले असून, अनेक संशयास्पद बँक खात्यांचा वापर झाल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रीय सायबर तक्रार प्रणालीवरील आर्थिक व्यवहारांची साखळी तपासताना मुंढवा, फुरसुंगी, काळेपडळ, विमानतळ आणि खराडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील पाच प्रकरणांचा उलगडा झाला आहे.
तपासात विविध बँक खात्यांद्वारे देशभरातील सायबर फसवणुकीची कोट्यवधी रुपयांची रक्कम स्वीकारून ती इतर खात्यांमध्ये वर्ग करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.या प्रकरणांमध्ये संबंधित खातेदारांविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी नागरिकांना कोणालाही स्वतःचे बँक खाते वापरण्यास देऊ नये, अन्यथा अशा ‘म्युल खात्यां’मुळे गंभीर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही दिला आहे.





