विश्वासघात! मालकाच्याच कर्मचाऱ्याने ६.५ लाखांच्या चोरीचा कट रचला

Rokhthok Maharashtra 3 0

पुण्यात विश्वासाला तडा देणारी घटना समोर आली आहे. अनेक वर्षे मालकाकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच लाखोंची रोकड लुटण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. स्वारगेट पोलिसांनी मालकाच्या ६ लाख ५० हजार रुपयांच्या रोकड चोरीप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये जयंत शहा, सोहेल खान आणि तौसीफ बागवान यांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कर्ज फेडण्यासाठी कर्मचाऱ्याने स्वतःच्या जावयासह साथीदाराच्या मदतीने हा कट रचला.
गुलटेकडी परिसरात वॉचमन रोकड घेऊन जात असताना आरोपींनी बॅग हिसकावून दुचाकीवरून पलायन केले होते.
स्वारगेट पोलिसांनी १५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून आरोपींना अटक केली असून, चोरीची संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.