अहिल्यानगरमध्ये महापालिका कर्मचाऱ्याची हत्या! कबरस्तानात हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक

Rokhthok Maharashtra 11 0

धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिका कर्मचाऱ्यावर हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, चौघांना अटक!
अहिल्यानगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महानगरपालिकेच्या विद्युत विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या धीरज परदेशी यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. गंभीर जखमी झालेल्या धीरज यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी संध्याकाळी मुकुंदनगर दर्गा दायरा परिसरातील कबरस्तानात विद्युत पोलचे काम सुरू असताना धीरज यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.
या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी युनूस शेख, मेहराज सय्यद, सिराज सय्यद आणि मुस्तकीम सय्यद या चौघांना अटक केली आहे.
मात्र, धीरज यांच्यावर हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, याचा तपास अद्याप सुरू आहे. धीरज हिंदुत्ववादी होते, म्हणून त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. पोलिसांकडून या आरोपाचीही चौकशी केली जात आहे.
दरम्यान, घटनेनंतर अहिल्यानगरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून हिंदुत्ववादी संघटनांनी बंदचा इशारा दिला आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी खबरदारी घेतली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.