बापानेच दोन मुलांना कालव्यात फेकलं? पोलिस चौकशीत धक्कादायक कबुली

Rokhthok Maharashtra 5 0

बापानेच आपल्या दोन चिमुकल्या मुलांना कालव्यात फेकल्याच्या घटनेला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. पोलिसांच्या चौकशीत वडिलांनी स्वतः मुलांसह कालव्यात उडी मारल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण परिसरात ही घटना घडली. कार्तिक आणि आरुष अशी दोन्ही चिमुकल्यांची नावं असून, आरोपी पिता सोमनाथ रोडगे याने मुलांना फिरायला नेण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून कालव्याजवळ नेल्याचा आरोप आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी परमेश्वर दामोदर रोडगे मुलांना शेतातील मोटर सुरू करण्यासाठी कालव्याजवळ घेऊन गेला होता. मात्र, चौकशीत त्याने मुलांसह पाण्यात उडी मारल्याची कबुली दिली. त्याला पोहता येत असल्याने तो बाहेर आला, मात्र दोन्ही मुलं पाण्यात बुडाली.
या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पाचोड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, १८ नोव्हेंबर रोजी आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुलांचा शोध सुरू असताना एका चिमुकल्याचा मृतदेह बुधवारी संध्याकाळी आढळल्याची माहिती आहे.
जन्मदात्या पित्याने असं टोकाचं पाऊल का उचललं? याचा तपास आता पोलीस करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.