प्रेयसीसाठी ५ लाखांची मागणी; अग्निवीर तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव!

Rokhthok Maharashtra 29 0

वडिलांच्या डोळ्यासमोर ११ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; पुण्यात खड्ड्याचा आणखी एक बळी
पुण्याच्या बालेवाडी-म्हाळुंगे परिसरातून काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात ११ वर्षीय शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
म्हाळुंगे येथील ग्रीन कोर्ट सोसायटीसमोर, दुर्गा कॅफेजवळ सोमवारी सायंकाळी सुमारे ७ वाजता हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हा चिमुकला आपल्या वडील आणि बहिणीसोबत दुचाकीवरून शिकवणीला जात होता. त्याचवेळी दुचाकी रस्त्यावरील खड्ड्यात गेल्याने वाहनाचा तोल गेला आणि दुचाकी घसरली.
यामध्ये मुलगा थेट रस्त्यावर फेकला गेला. त्याचवेळी मागून येणाऱ्या भरधाव *आयशर ट्रकच्या चाकाखाली* तो आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली. या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
परिसरातील खड्डे तातडीने बुजवावेत, धोकादायक ठिकाणी सुरक्षा उपाययोजना कराव्यात आणि वाहनचालकांसाठी योग्य सूचना फलक लावावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
एका खड्ड्यामुळे ११ वर्षीय चिमुकल्याचा जीव गेल्याने प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.