एकाच मुलीवर दोन गुंडांचं प्रेम! रस्त्यावर अर्धा तास जीवघेणी झुंज; बेल्टमधला चाकू छातीत घुसला अन्…

Rokhthok Maharashtra 6 0

नागपूरमध्ये एका मुलीच्या प्रेमप्रकरणातून दोन कुख्यात गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादाचा थरारक शेवट झाला आहे. नरेंद्रनगरच्या सुंदरबन परिसरात कुख्यात हिस्ट्रीशीटर गौरव रगडे याची हत्या करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, गौरव रगडेचे सपना नावाच्या तरुणीसोबत मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, तिची गौरव राऊतसोबतही जवळीक वाढली होती. याच प्रेमत्रिकोणातून दोघांमध्ये वाद सुरू झाला.
गुरुवारी गौरव राऊतच्या घरी दारूची पार्टी सुरू असताना सपना तिथे असल्याची माहिती रगडेला मिळाली. संतापलेल्या रगडेने घराचा दरवाजा ठोठावला, खिडकीच्या काचा फोडल्या आणि राऊतला पाहताच दोघांमध्ये वाद झाला.
यानंतर दोघांमध्ये रस्त्यावर जवळपास अर्धा तास जीवघेणी झुंज झाली. मारामारी करत दोघे अजनी परिसरातून बेलतरोडी पोलिसांच्या हद्दीपर्यंत पोहोचले.
याचवेळी राऊतने रगडेच्या कमरेजवळील बेल्टला लावलेला चाकू काढला आणि त्याच्या छातीत वार केला. पोलिसांनी राऊतला ताब्यात घेतले, तर रगडेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी गौरव राऊत आणि दीपक वासनिक यांच्यावर कारवाई करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.