सिल्वर ओकवर 3 तास बंद दाराआड खलबतं! पार्थ पवार-शरद पवारांची भेट; राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार?

Rokhthok Maharashtra 27 0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींच्या चर्चांना उधाण आलं आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे खासदार पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची सिल्वर ओकवर भेट घेतली.
बुधवारी रात्री सुमारे आठ वाजता सुरू झालेली ही भेट तब्बल तीन तास चालली आणि रात्री अकराच्या सुमारास संपली.
आजोबा आणि नातवामध्ये झालेल्या या दीर्घ बैठकीचं अधिकृत कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना मोठं उधाण आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार, विलीनीकरण होणार आणि शरद पवारांचा गट सत्तेत सहभागी होऊ शकतो, अशा राजकीय चर्चा सुरू आहेत.
त्यामुळे सिल्वर ओकवरील या बैठकीत राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत काही चर्चा झाली का? अटी-शर्तींवर खलबतं झाली का? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
मात्र, बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत शरद पवार किंवा पार्थ पवार यांच्याकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
त्यामुळे तीन तासांच्या या बंद दाराआडच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या राजकारणात नेमका कोणता ट्विस्ट येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.