हडपसरमध्ये ‘निरामय साहित्य मंचा’चा शुभारंभ! डॉक्टरांच्या साहित्यिक प्रतिभेला मिळणार नवे व्यासपीठ

Rokhthok Maharashtra 4 0

पुणे | हडपसर :

डॉक्टरांचे काम हे केवळ रुग्णांचे शारीरिक आरोग्य जपण्यापुरते मर्यादित नसून, त्यांच्या मनातील साहित्यिक आणि कलात्मक संवेदनांनाही आता एक नवे व्यासपीठ मिळणार आहे. ‘निरामय हडपसर साहित्य मंच’चा शुभारंभ आणि कार्यारंभ सोहळा रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी हडपसर मेडिकल असोसिएशन भवन, पुणे येथे उत्साहात पार पडला.
या साहित्य मंचाची संकल्पना ‘डॉक्टर शरीराचे आरोग्य जपतात; साहित्य मनाचे आरोग्य जपते’ या विचारावर आधारित आहे. हडपसर परिसरातील डॉक्टरांमध्ये अनेक कवी, लेखक, वाचक आणि साहित्यप्रेमी आहेत. त्यांच्या साहित्यिक प्रतिभेला संघटित आणि हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या मंचामागचा मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमाचे संस्थापक डॉ. मनोज लडकत, हडपसर, पुणे आहेत.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पंडीतजी संदीप अवचट उपस्थित होते. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते डॉ. पंडीत संदीप अवचट यांच्याशी झालेल्या ‘दिलखुलास गप्पा’.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने झाली. त्यानंतर साहित्यिक वृक्ष, काव्यवाचन, मान्यवरांचे मनोगत आणि साहित्यिकांचा सन्मान असे विविध कार्यक्रम पार पडले.
यावेळी पुणे मनपा नगसेवक डॉ. दादा कोद्रे, भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉ. बाळासाहेब हरपळे, भाजपा हडपसर विधानसभा मंडलाध्यक्ष श्री. समीर घुले, डॉ. वैष्णवी पाटांगणकर, डॉ. अर्चना चव्हाण, कवयित्री राजश्रीताई सोले आणि ह.भ.प. पांडुरंगजी घुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच हडपसर परिसरातील डॉ. हरिदास ओंकार, डॉ. रमेश क्षीरसागर, डॉ. रसिक गांधी, डॉ. सुनिल मालुसरे, डॉ. मंगेश बोराटे, डॉ. रसिक झांजे, डॉ. अश्विनी जादाळे, डॉ. सविता लडकत, डॉ. सारीका लडकत, डॉ. श्रीकांत कदम, डॉ. विशाल साळुंखे, डॉ. अमोल जगताप, डॉ. सूरज बनकर, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. विनया सांगळे आणि डॉ. साळुखे विशाल यांच्यासह अनेक डॉक्टर उपस्थित होते.
योगाचार्य अतुल रासकर, तसेच अखिल भारतीय नाट्य परिषद हडपसरच्या मा. प्रिया कुलकर्णी आणि प्राजक्ता कुलकर्णी यांचीही उपस्थिती लाभली.
यावेळी हडपसर मेडिकल असोसिएशनचे सृजनदीप संपादक मंडळ आणि हडपसर साहित्य विभागाचे सदस्य उपस्थित होते.
भविष्यात या मंचाच्या माध्यमातून नियमित काव्यवाचन, साहित्यिक बैठका, लेखकांशी संवाद, व्याख्यानमाला, नवोदित साहित्यिकांसाठी व्यासपीठ आणि विविध साहित्यिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
आरोग्य आणि साहित्य यांची सांगड घालत ‘निरामय समाजासाठी निरामय विचार’ ही संकल्पना पुढे नेण्याचा संकल्प या माध्यमातून करण्यात आला आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.