ASI पांडुरंग पाटील यांची आत्महत्या?

Rokhthok Maharashtra 9 0

नवी मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग निंबा पाटील, वय ५६, यांच्या आत्महत्येच्या घटनेने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. महापे येथील साची लॉजमध्ये त्यांनी गळफास घेतल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.
पाटील हे नवी मुंबई पोलीस दलाच्या विशेष शाखेत कार्यरत होते. गेल्या दोन दिवसांपासून ते घरी न गेल्याने कुटुंबीय चिंतेत होते. शनिवारी कुटुंबीय बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी वाशी पोलीस ठाण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता महापे येथील साची लॉजमध्ये पाटील मृतावस्थेत आढळले.
दरम्यान, आत्महत्येपूर्वी पांडुरंग पाटील यांनी दोन व्हिडीओ रेकॉर्ड केल्याची माहिती समोर आली आहे. एका व्हिडीओमध्ये त्यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे न्यायाची मागणी केली असून, एका माजी पोलीस उपायुक्त, एका सहाय्यक पोलीस आयुक्त आणि हेड क्लार्क यांच्याकडून त्रास होत असल्याचा आरोप केल्याचे सांगितले जात आहे.
दुसऱ्या व्हिडीओमध्ये त्यांनी मुलगी आणि जवळच्या व्यक्तींची माफी मागितल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.