साकुर्डेत बिबट्याचा हल्ला; वासराचा मृत्यू!

Rokhthok Maharashtra 8 0

जेजुरी परिसरातील साकुर्डे येथे शुक्रवारी रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सहा महिन्यांचे जर्सी गायीचे वासरू मृत झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
साकुर्डे येथील पशुपालक महादेव पवार यांच्या मालकीचे हे वासरू असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच सासवड वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.
पंचनाम्यानंतर शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई मिळण्यासाठीची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, साकुर्डे परिसरातील पशुपालकांनी सतर्क राहावे, तसेच बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.