दहीहंडीचा सांगाडा कोसळला; महिलेचा मृत्यू!

Rokhthok Maharashtra 6 0

पुण्यातील जुन्या सांगवी परिसरात दहीहंडी उत्सवासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी सांगाड्याचा भाग कोसळून ४५ वर्षीय सलमा सलाउद्दीन पठाण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
शुक्रवारी रात्री विघ्नहर्ता मंडळाचा दहीहंडी उत्सव संपल्यानंतर लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम सुरू होते. याचवेळी सांगाड्याचा एक भाग अचानक कोसळून सलमा पठाण यांच्या डोक्यावर पडला. गंभीर जखमी झालेल्या सलमा यांना रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल उपस्थित झाला आहे. सांगाडा हटवताना आवश्यक सुरक्षा उपाय करण्यात आले होते का, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, मृत महिलेचा मुलगा संबंधित मंडळाशी जोडलेला असल्याने कुटुंबीयांनी मंडळाविरोधात तक्रार देण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.