भोरमध्ये सागर पालवेंवर गोळीबार; हत्या!

Rokhthok Maharashtra 4 0

भोर तालुक्यातील रांझे गावच्या हद्दीतील आर्वी फाटा येथे पहाटेच्या सुमारास ३ वाजता रक्तरंजित हल्ल्याची घटना घडली आहे. सागर पालवे, वय ३५, यांच्यावर ४ ते ५ हल्लेखोरांनी गोळीबार करत कोयत्याने हल्ला केला.
या हल्ल्यात सागर पालवे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, हल्ल्यामागचे नेमके कारण काय आणि हल्लेखोर कोण आहेत, याचा शोध घेतला जात आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, सागर पालवे यांच्या हल्ल्याने भोरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.