कराड तालुक्यात ३३०२ पेन्शन लाभार्थ्यांची DLC प्रलंबित; ८ दिवसांची मुदत!

Rokhthok Maharashtra 3 0

विशेष सहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या माध्यमातून कराड तालुक्यातील १५ हजार १५२ लाभार्थ्यांना पेन्शन दिली जाते.
मात्र, यापैकी ३३०२ लाभार्थ्यांनी अद्याप डीएलसी अर्थात डिजिटल हयात प्रमाणपत्र काढलेले नाही.
शासनाकडून यापूर्वी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली असून, प्रसिद्धी माध्यमे तसेच क्षेत्रीय स्तरावर लाभार्थ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
आता तहसील कार्यालयाने डीएलसी प्रमाणपत्र काढण्यासाठी ८ दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्यांची पेन्शन बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
त्यामुळे कराड तालुक्यातील डीएलसी प्रलंबित असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी तातडीने डिजिटल हयात प्रमाणपत्र काढून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार कल्पना ढवळे यांनी केले आहे.
आठ दिवसांत डीएलसी करा, अन्यथा पेन्शन बंद होण्याची शक्यता!
– कल्पना ढवळे, तहसीलदार, कराड 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.