माहूर घाटात काळाचा घाला! रेणुकामातेचं दर्शन घेऊन परतताना टेम्पो १०० फूट दरीत; तिघांचा मृत्यू

Rokhthok Maharashtra 7 0

रेणुकामातेचं दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला! माहूर घाटात टेम्पो १०० फूट दरीत कोसळला; तिघांचा मृत्यू, तीन जण गंभीर!
नमस्कार, पाहत आहात रोखठोक महाराष्ट्र न्यूज!
माहूरच्या रेणुकामातेचं दर्शन घेऊन आनंदाने परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. माहूर घाटातील पहिल्याच धोकादायक वळणावर भाविकांचा टेम्पो तब्बल १०० फूट खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून, अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
शुक्रवारी, १६ ऑक्टोबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यवतमाळ येथील फर्निचर दुकानात काम करणारे सहा सहकारी गुरुवारी रात्री माहूरला दर्शनासाठी आले होते. रेणुकामातेचं दर्शन घेतल्यानंतर ते यवतमाळला परतत असताना हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर प्रकाशामुळे चालकाचा ताबा सुटला. घाटात संरक्षक कठडा नसल्याने टेम्पो थेट दरीत कोसळला. अपघातानंतर बचावकार्य करत दीड तासांच्या प्रयत्नांनी सर्वांना बाहेर काढण्यात आलं.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घाटातील धोकादायक वळणांवर संरक्षक कठडे नसल्याचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा रोखठोक महाराष्ट्र न्यूज!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.