पुणे पोलीस भरतीत बनावट प्रमाणपत्रांचा पर्दाफाश! १९ जणांवर कारवाई, ४ अटकेत

Rokhthok Maharashtra 6 0

पुण्यातून पोलीस भरती प्रक्रियेतील एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहर पोलीस भरतीत कुराश या खेळाची बनावट प्रमाणपत्रे सादर करून खेळाडू आरक्षणाचा लाभ घेतल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणात तब्बल १९ उमेदवारांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त *अमितेश कुमार* यांनी दिली आहे.
या १९ उमेदवारांपैकी १० जणांना यापूर्वीच पोलीस सेवेत रुजू करून घेण्यात आले नव्हते. तर प्रशिक्षण घेत असलेल्या उर्वरित ९ जणांना प्रशिक्षणातून परत बोलावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या उमेदवारांना पोलीस सेवेतून दूर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली असून, तब्बल १९ संघटना तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याचे वृत्त आहे.
बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पुणे पोलीस भरतीतील या प्रकरणामुळे भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.