अंगावरच्या कपड्यांनिशी घराबाहेर पडले, संसार मात्र आगीत राख! टिंबर मार्केटमधील कुटुंबांचे अश्रू

Rokhthok Maharashtra 5 0

अंगावरच्या कपड्यांनिशी घराबाहेर पडले… पण डोळ्यांसमोर आयुष्यभराचा संसार आगीत राख झाला! पुण्यातील भवानी पेठ टिंबर मार्केटमध्ये लागलेल्या आगीने अनेक कुटुंबांना मोठा फटका बसला आहे.
रात्री गाढ झोपेत असताना अचानक आग लागल्याची आरोळी ऐकू आली आणि क्षणात आगीने परिसराला विळखा घातला. जीव वाचवण्यासाठी कुटुंबांनी घराबाहेर धाव घेतली, मात्र घरातील धान्य, दिवाळीसाठी घेतलेले कपडे, दागिने, रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे आगीत जळून खाक झाली.
आशा पवार यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहत होते. या आगीत संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाल्याने आता पुन्हा उभं राहायचं कसं, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
मुस्कान इद्रिसी यांचंही ६० हजार रुपयांची रोकड, तीन तोळे सोने आणि आयुष्यभराची पुंजी आगीत जळून खाक झाली.
जीव वाचला, पण संसार राख झाला… टिंबर मार्केटमधील पीडित कुटुंबांचे अश्रू अनावर झाले आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.