कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या! फावड्याने हल्ला करून नवरा शेजारी जाऊन झोपला

Rokhthok Maharashtra 9 0

कौटुंबिक वादातून संतापलेल्या नवऱ्याने पत्नीवर फावड्याने आणि काठीने हल्ला केला… रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर हत्या केल्यानंतर आरोपी शेजारी जाऊन झोपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मध्य प्रदेशातील धनपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बडीखुर्द येथील कुदरा टोला परिसरात ही घटना घडली. रामकुमार बैगा, वय ४७, याचा पत्नी गुडिया बैगा हिच्यासोबत कौटुंबिक कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर त्याने पत्नीवर काठी आणि फावड्याने हल्ला केला. गंभीर जखमांमुळे तिचा मृत्यू झाला.
हत्या केल्यानंतर आरोपी घरात न थांबता शेजारी जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपीच्या भावाला घरात महिलेचा मृतदेह आढळून आला आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून, हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.