सोनं तब्बल ६५ हजारांनी स्वस्त! आता खरेदी करायचं की आणखी वाट पाहायची?
गेल्या काही महिन्यांत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांसमोर आता प्रश्न आहे… सोनं खरेदी करायचं की आणखी भाव कमी होण्याची वाट पाहायची?
गेल्या ११ महिन्यांत सोन्याचा दर तब्बल ६५ हजार रुपयांनी घसरल्याचा दावा करण्यात येत असून, सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख २८ हजार रुपयांवर आला आहे. तर चांदीचा भावही किलोमागे २ लाख ६० हजार रुपयांनी घसरून १ लाख ६० हजारांवर पोहोचला आहे.
दरम्यान, गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार सोन्याच्या दरात भविष्यात पुन्हा तेजी येऊ शकते. २०२७ अखेर सोनं १ लाख ४० हजार, तर २०२८ अखेर १ लाख ६९ हजार रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मात्र, व्याजदर, केंद्रीय बँकांची खरेदी आणि जागतिक गुंतवणूक यावर सोन्याचे भाव अवलंबून असणार आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करण्यापूर्वी बाजाराचा अभ्यास आणि जोखीम लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.





