पुण्यात १३ डिसेंबरला AMC हाफ मॅरेथॉनचा थरार! आरोग्याचा संदेश देण्यासाठी भव्य मॅरेथॉन!

Rokhthok Maharashtra 11 0

पुण्यात १३ डिसेंबरला AMC हाफ मॅरेथॉनचा थरार! ३ हजार स्पर्धकांची नोंदणी पूर्ण; रेस टी-शर्टचे दिमाखात अनावरण!
आरोग्य जनजागृतीचा संदेश देण्यासाठी असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट अर्थात AMC पुणे यांच्या वतीने येत्या १३ डिसेंबर रोजी भव्य हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनमध्ये हजारो धावपटू सहभागी होणार असून डॉक्टर, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, आर्मी व नेव्ही रनर्स, शाळकरी व काॅलेजचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक संघ व गुडघा प्रत्यारोपण झालेले रुग्ण तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर धावपटूंचा सहभाग हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण असणार आहे.
या हाफ मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी हडपसर येथील नोबल एचएमए भवन येथे रेस टी-शर्ट अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी उद्योजक दशरथ जाधव, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त विष्णू ताम्हाणे, HMA, SRDA, SHDA, KMDA, DENTAL आधी संलग्न वैद्यकीय संघटना यांचे माजी अध्यक्ष व आजी पदाधिकारी जसे की डॉ.दादा कोद्रे,डॉ मनोज कुंभार व डॉ शंतनु जगदाळे, डॉ राजेश खुडे, डॉ सुरज बनकर, डॉ राकेश पवार, डॉ अमोल जगताप, डॉ.दीपक शिंदे, डॉ. जयदीप फरांदे, तसेच मॅरेथॉन ऍम्बेसिडर्स, पेसर्स, मगरपट्टा स्पोर्ट्स टीम, ब्ल्यू ब्रिगेड चे अजय देसाई यांची उपस्थिती होती.
स्वागतपर भाषणात AMC अध्यक्ष डॉ साधना धर्माधिकारी यांनी OBESITY च्या गंभीर समस्येवर भाष्य करताना marathon चे महत्व विषद केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रेस डायरेक्टर डॉ. ओंकार हरिदास यांनी मॅरेथॉनचे नियोजन, तयारी आणि स्पर्धेच्या आयोजनाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी मॅरेथॉनच्या तयारीवर आधारित विशेष शॉर्ट फिल्मचेही सादरीकरण करण्यात आले. सूत्रसंचालन सह सचिव डॉ हृषिकेश मेहता व आभार प्रदर्शन सचिव डॉ हिमांशु पेंडसे यांनी केले.

AMC चे नियोजित अध्यक्ष डॉ. चेतन म्हस्के, उपाध्यक्ष डॉ. रोशनी कावळे, कोषाध्यक्ष डॉ. सुशांत शिंदे, सह कोषाध्यक्ष डॉ.निधी जैन यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. तसेच रेस सेक्रेटरी डॉ अक्षय राऊत,डॉ अजितेय ताम्हाणे,डॉ. रश्मी भावसार, डॉ.आनंद भन्साळी, डॉ. पवन चुंबळे, डॉ.प्रतीक राऊत सहभागी झाले होते.

या स्पर्धेला मगरपट्टा सिटी, नोबल हॉस्पिटल, सिल्वर लाइनिंग आयव्हीएफ सेंटर, सिझन्स मॉल, MOC कॅन्सर रिसर्च सेंटर, Amdocs, Eaton, सह्याद्री हॉस्पिटल, मिडास हिलिंग सेंटर, विश्वराज हॉस्पिटल, विलू पूनावाला हॉस्पिटल, जागृती रिहाबिलिटेशन सेंटर, पोकारी स्वेट हायड्रेशन, यांसह अनेक नामांकित संस्था आणि कंपन्यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. तसेच माजी उपमहापौर निलेश मगर यांचेही या उपक्रमाला सहकार्य मिळत आहे.

विशेष म्हणजे, या मॅरेथॉनसाठी आतापर्यंत तब्बल ३ हजार स्पर्धकांनी नोंदणी केली असून येत्या तीन आठवड्यांत हा आकडा दुप्पट करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे. सोशल मीडिया, पोस्टर्स, होर्डिंग्ज, चित्रपटगृहांमधील ध्वनिफीत आणि विशेष व्हिडिओंच्या माध्यमातून मॅरेथॉनचा प्रचार आणि जनजागृती केली जात आहे.
एकंदरीत, आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारी ही AMC हाफ मॅरेथॉन पुणेकरांसाठी एक मोठा क्रीडा आणि जनजागृतीचा उत्सव ठरणार आहे.
१३ डिसेंबरला होणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये पुणेकरांचा सहभाग किती मोठा ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
रोखठोक महाराष्ट्र न्यूज, हडपसर, पुणे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.