उंड्रीकरांच्या तक्रारींचा दणका! श्रद्धा इन्फ्राटेकचा RMC प्लांट बंद करण्याचे MPCB चे आदेश!

Rokhthok Maharashtra 4 0

उंड्रीकरांच्या तक्रारींचा दणका! प्रदूषण करणाऱ्या RMC प्लांटला टाळे ठोकण्याचे आदेश; MPCB ची मोठी कारवाई!

पुण्यातील उंड्री परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. हवेतील प्रदूषण आणि धुळीच्या त्रासामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या तक्रारींची अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दखल घेतली आहे.श्रद्धा इन्फ्राटेकच्या रेडी मिक्स काँक्रीट अर्थात RMC प्लांटला तात्काळ बंद करण्याचे आदेश MPCB ने २० नोव्हेंबर २०२६ रोजी जारी केले आहेत.

प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे पालन न करणे, संमतीपत्रातील अटींचे उल्लंघन आणि मंडळाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका या आदेशात ठेवण्यात आला आहे.एवढेच नाही, तर संबंधित प्लांटचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश महावितरणला, तर पाणीपुरवठा बंद करण्याचे निर्देश पुणे महानगरपालिकेला देण्यात आले आहेत.

उंड्री परिसरातील नागरिकांनी प्रदूषणाविरोधात केलेल्या तक्रारीनंतर ही महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली आहे.

मात्र, आता या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती वेगाने होते आणि नागरिकांना धुळीच्या प्रदूषणातून खरोखर दिलासा मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रदूषणावर प्रशासनाचा असा धडाका कायम राहणार का?

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.