पुणे (प्रतिनिधी)
कोरोना च्या महामारी मध्ये पुणे मनपा प्रशासनाच्या विनंती वरुन ससाणे एज्युकेशन सोसायटी चेअरमन श्री गोरक्षनाथ देवराम ससाणे व ससाणे पंचवाडा मंडळ चेअरमन बाळासाहेब हरिभाऊ ससाणे हडपसर व सर्व संचालक मंडळांने नगरसेवक योगेश दत्तात्रय ससाणे याच्या विनंती वरुन संस्थेची
ससाणेनगर येथील एक इमारत पुणे मनपा आरोग्य विभागास क्वाॅरनंटाईन सेंटर करण्यासाठी देण्याची तयारी दर्शवली आहे.
आज ही इमारत पाहणी मनपा अधिकारी श्री. मुल्ला व नगरसेवक योगेश ससाणे तसेच सस्थेचे चेअरमन यांनी केली. कर्तव्य म्हनुन सकारात्मक निर्णय घेतला असल्याची भावना गोरक्षनाथ ससाणे व बाळासाहेब ससाणे यांनी बोलुन दाखवली.
याविषयी नगरसेवक योगेश ससाणे यांनी इतिहासाचा दाखला देत माहीती दिली की
सन १८९७ ला पुण्यात प्लेग ची साथ आली होती तेव्हा हजारो लोक मरण पावले होते तेव्हा सावित्री माई फुले यांना प्लेग मधील अडकलेल्या लोकांचे हाल सहन झाले नाहीत. त्यांनी प्लेगपिडितांसाठी पुणे शहराजवळील ससाणे याच्या माळावर हाॅस्पिटल सुरु केले. त्यांनी स्वत प्लेग पिडीतांची सेवा केली होती.
हाच तो ससाणे माळ म्हणजे आजचे ससाणेनगर असुन आजच्या या महामारीमध्ये आम्ही ससाणे कुंटुब सावित्रीमाईचा विचाराचा वारसा जपत प्रशासनास मदत म्हणून ही इमारत महापालिका आरोग्य विभागास देण्याचा निर्णय घेतला आहे.
संस्थेच्या प्रांगणात १५ मार्च २०२० रोजी फुले दापंत्याचे अर्धपुतळ्याचे अनावरण राज्याचे अन्न वितरण मंत्री छगनरावजी भुजबळ साहेबांच्या हस्ते झाला होता.
आता त्यांच आवारात कोरोना क्वांरंनटाईन सेंटर चालु झाल्याने सावित्रीमाई व ज्योतीराव फुलेंना या माध्यमातुन एक प्रकारे आदरांजली वाहीली जाईल असेही नगरसेवक ससाणे म्हणाले.
रोखठोक महाराष्ट्र न्युज फ्लॅश… कोरोना विषाणू प्रसार रोखण्यास प्रशासनाला मदत ; हडपसर मधील शाळेच्या इमारतमध्ये महापालिका केंद्र ; नगरसेवक योगेश ससाणे यांची माहिती

Related tags :
372 Comments
Oldest