औद्योगिक वसाहत मध्ये मजुरांना धान्य वाटप ; गरीब रुग्णांसाठी धावतोय तुकाराम रिक्षाचालक

Rokhthok Maharashtra 1 0


रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाइन
पुणे (प्रतिनिधी).
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हडपसर, मतदार संघातील रामटेकडी औद्योगिक वसाहत मधर  बांधकाम मजूर यांची उपासमार सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल  चे वरिष्ठ_उपाध्यक्ष  तुकाराम शिंदे व सहकाऱ्यांच्या वतीने धान्य, कडधान्य व भाजीपाला वाटप त्या गरजुवंताना करण्यात आले.
तुकाराम शिंदे व बलराम शिंदे यांनी गरजूंना मदतीचा हात देत माणुसकीचे दर्शन घडविले आहे, मजुरांना काम नाही, खायला घरात धान्य नाही, शासनाकडून मदत मिळत नाही, त्यातच तुकाराम शिंदे सारखे जागरूक कार्यकर्ते मदतीचा हात देत असल्याने निराधारांना आधार मिळत आहे.

रिक्षाचालक धावून जातो रुग्णांच्या मदतीला
राष्ट्रवादी काँग्रेसचा ओबीसी विभागात पदाधिकारी असलेला तुकाराम शिंदे आजारी लोकांना रुग्णालयात घेऊन धावतो, आपल्या आरोग्याची काळजी घेत असताना इतरांसाठी प्रसंगी आपला जीवही धोक्यात घालण्यास मागेपुढे पाहत नाही, तुकाराम शिंदेच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.