पुणे

आम आदमी पार्टीकडून दिल्लीचे उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेप्रकरणी पुण्यामध्ये निदर्शने. ..!

पुणे:प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

आम आदमी पार्टीचे दिल्ली उपमुख्यमंत्री तथा शिक्षण मंत्री मा. मनीष सिसोदिया यांना सीबीआय ने सुडभावनेने अटक केली, मूळ तक्रारीत त्यांचे नाव नसून देखील त्यांची अटक ही दडपशाही आहे अशा कृत्त्याचा विरोध सर्व भारतीयांनी करायला हवा,असे वक्तव्य पुण्याचे आम आदमी पार्टी चे कार्यध्यक्ष विजय कुंभार यांनी केले.

दिल्ली मॉडेल यशस्वीपणे राबवण्यात मा. सिसोदिया यांचे मोठे योगदान आहे, दिल्लीच्या विकासामुळे भारतीय जनता पार्टी दिल्लीची सत्ता काबीज करू शकली नाही, नुकत्याच झालेल्या दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या हातातून सत्त्ता मिळवण्यात आम आदमी पार्टी ला यश आले, या आधी देखील आम आदमी पार्टीच्या तसेच विरोधी पक्षांवर खोटे आरोप करून अडकवण्याचे काम चालू आहे मा. सिसोदिया यांचे अटकेच्या निषेधासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने सनदशीर मार्गाने निदर्शन पुण्यात बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचे नेत्रुत्व पुण्याचे कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी केले, विजय कुंभार यांच्या भाषणाने आंदोलनाचा समारोप झाला असे या भाजपच्या राज्यात जुलूम होऊ शकतो, त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितिला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे अशी आवाहन विजय कुंभार यांनी केले, अनेक मान्यवर यांची भाषणे झाली तसेच या आंदोलनात पुण्यातील अनेक प्रभगातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते, यामधे पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्डत, युवा उपाध्यक्ष संदीप सोनवणे, पुणे शहर समन्वयक अभिजित मोरे, फेबियन आणा, सुरेखा भोसले, धनंजय बेनकर, आनंद अंकुश, रवी लाटे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी होते.