पुणेमहाराष्ट्र

महादेवनगरमधील इंदिरा शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना दिवाळी भेट

मांजरी, दि. 31 ः महादेवनगरमधील इंदिरा शिक्षण संस्थेमध्ये बीएनवाय मीलियन आणि सीएफआय यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी महोत्सवाचे आयोजन सीईओ किशोर देशमुख, हेमंत आंदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब विभुते, सचिव निलेश कुदळे उपाध्यक्ष शांताराम गाडेकर, संचालक भास्करराव औंधे, काळुराम हिंगणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना दिवाळी भेट देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी पणत्यांचे रंगकाम आणि आकाश कंदील बनवण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

 

मुख्याध्यापिका सीमा दीक्षित, विकास नेवसे, सीमा चौगुले, संतोष पवार, विमल शिंदे, ज्योती गालफाडे, अश्विनी ढोकाडे, मुख्याध्यापिका सुवर्णा झेंडे, चित्रा राऊत यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
शर्मिला कुदळे यांनी सूत्रसंचालन केले.